#हल्ला

Showing of 4018 - 4031 from 4069 results
विश्वासू नेतृत्व हवं- शरद पवार

बातम्याDec 1, 2008

विश्वासू नेतृत्व हवं- शरद पवार

आशिष दीक्षित1 डिसेंबर, नवी दिल्ली ' राज्यातील सर्वसामान्य जनतेला विश्वास देण्याची गरज आहे. सध्या राज्याला विश्वासू नेतृत्व हवं. शाळेत गेलेला प्रत्येक मुलगा सायंकाळी सुरक्षित घरी येईल, असा विश्वास प्रत्येक मातेमध्ये निर्माण करणारं नेतृत्व हवं ', असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितलं. 'आयबीएन लोकमत ' ला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत शरद पवार महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत बोलत होते.उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, ' आर. आर.पाटील यांनी राजीनामा देण्यास उशीर केलेला नाही. हल्ला झाल्यानंतर त्यांनी लागलीच राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. मी म्हटलं की ऑपरेशन सुरू आहे. तुम्ही मैदान सोडता कामा नये. तुम्हाला मैदानात राहावचं लागेल. परिस्थितीशी सामना करावा लागेल. ऑपरेशन संपल्यानंतर तुम्ही निर्णय घ्या आणि मला सांगा. त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला. हल्ला छोटा होता, असं त म्हणालेच नाही. ते जबाबदार नेते आहेत '. राज्याचा नवा मुख्यमंत्र्याबाबत काँग्रसेनं मत विचारलं तर देईन , असं पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या नव्या उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार उद्या निवडण्यात येणार असल्याचं शरद पवार यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं.