Elec-widget

#हल्ला

Showing of 4005 - 4018 from 4057 results
दुर्घटनेनंतर सावरताना... (भाग : 3)

बातम्याDec 2, 2008

दुर्घटनेनंतर सावरताना... (भाग : 3)

दुर्घटना झाल्यानंतर नेमकं काय करावं हे आपल्याला त्यावेळी सुचत नाही. दुर्घटना सांगून येत नाही मग तो दहशतवाही हल्ला असो किंवा अपघात, ती एकप्रकारची आपत्ती असते. असं काही झाल्यावर नेमकं काय करावं यावर आपण चर्चा करण्यासाठी ' टॉक टाइम 'मध्ये ट्रॉमा स्पेशालिस्ट सुबोध मेहता आले होते. दुर्घटनेनंतर सावरताना त्यांनी कोणते उपचार आणि उपाय करायला हवेत याचं मार्गदर्शन त्यांनी केलं. ' ट्रॉमा ' या शब्दाचा अर्थ सांगताना डॉक्टर म्हणाले, " ' ट्रॉमा ' म्हणजे कोणत्याही प्रकारचा अपघात. ' ट्रॉमा 'मध्ये पाच प्रकारच्या अपघातांचा समावेश होतो. पहिला अपघातांचा प्रकार आहे वाहनांचा. गाड्यांची ठोकर, चुकीच्या पद्धतीन गाडी चालवणं, रागाने गाडी चाववणं, गाडी स्लीप होणं हे अपघात वाहनांच्या अपघातात येतात. उतारवयात होणा-या दुखापती ही ' ट्रॉमा 'मध्ये येतात. उतारवयातले अपघात हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात. तरुणपणी बेजबाबदारपणामुळे होणारे अपघातही ' ट्रॉमा 'मध्ये येतात. हल्ली आपल्याला एका नव्या संकटानं ग्रासलं आहे आणि ते म्हणजे दहशतवाद-गोळीबार, बॉम्बस्फोट... यांचाही समावेश ट्रॉमामध्ये होऊ लागला आहे. मल्टीपल कॉम्पलेक्स इन्ज्युरीजही ट्रॉमामध्ये येतात. कोणताही अपघात झाल्यावर बघ्याची भूमिका न घेता प्रसंगावधान ओळखून आधी अपघातग्रस्तास डॉक्टरांकडे घेऊन जायचं. ज्या व्यक्तीने अपघातग्रस्तास डॉक्टरांकडे नेलंय त्या व्यक्तीने एफआरआय होईपर्यंत थांबलं नाही तरी चालतं. सर्वांनी प्रथोमचाराचे ABC शिकून घ्यायला हवेत. A - Airway, B - Breathing आणि C - Circulation. काही काही अपघांतांमध्ये अपघातग्रस्ताचा श्वास थंबतो. हृदयाचे ठोके नीट पडत नाहीत. शरीर थंडगार पडतं. अशावेळी डॉक्टरांकडे घेऊन जाईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तर प्रत्येक शाळा, कॉलेज, ऑफिस, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये प्रथमोपचारांचं शिक्षण दिलं गेलंच पाहिजे. " डॉक्टरांनी सांगितलेली माहिती तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईल. अपघातांचे प्रकार1. वाहनांमुळे होणारे अपघात.2. उतारवयात होणार्‍या दुखापती.3.तरुणपणी बेजबाबदारपणामुळे होणारे अपघात.4. दहशतवाद-गोळीबार किंवा स्फोटामुळे होणारे अपघात.5 Multiple Complex Injury. काय कराल?1. रक्तगट तपासून घ्या.2 वयाचा दाखला, संपर्कासाठीचा नंबर लिहून ठेवा.3. हेल्मेट वापरा.4. वेगावर नियंत्रण ठेवा.5. इतरांना मदत करा.6. अपघातस्थळी दुर्लक्ष न करता मदत करा, ही वेळ आपल्यावरही येऊ शकते.7. FIRST AID TRAINING घ्या.8. आदर्श नागरिक व्हा.हे लक्षात ठेवा : सर्वात आधी पोलिसांचे नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. ते पुढीलप्रमाणे आहेत. फोन - 100, 103, 1090, 22621855,22623054.कोणतही अनुचित प्रकार घडला आणि जर तुम्ही नजरेआड असाल तर प्रथम पोलिसांना तातडीनं कळवा.पोलिसांनी विचारलेली माहिती सांगा. अधिक माहिती देण्यासाठी मदत करा.न्हेगाराच्या गाडीचा नंबर दिसल्यास नोट डाऊन करा.एखादी व्यक्ती जखमी झाल्यास शक्य तितक्या लवकर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यास मदत करा.बघ्याची भूमिका घेऊ नका.आपल्या मोबाईलमध्ये आपलं नाव आणि घरचा नंबर असलेले बिजनेस कार्ड सेव्ह करून ठेवा.डायरीमध्ये रक्तगट, घरचा पत्ता, फोन नंबर लिहून ठेवा.