#स्वतःला पेटवून घेतले

...अन् मरणाने केली सुटका, हा VIDEO तुमचं मन विचलित करू शकतो!

व्हिडिओMay 14, 2019

...अन् मरणाने केली सुटका, हा VIDEO तुमचं मन विचलित करू शकतो!

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 14 मे : पिंपरी चिंचवडमध्ये एका वृद्धाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतल्‍याचा एक धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत रुपचंद धोंडीराम सुंदे नामक 85 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे रुपचंद स्वतःला पेटवून घेत असल्याची ही घटना cctv मध्ये कैद झाली. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पिंपरी शहरातील खराळवाडी येथे ही घटना घडली. या घटनेची चौकशी करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रुपचंद यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे या आजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी रात्री अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये ते १०० टक्के भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Live TV

News18 Lokmat
close