#स्पष्टीकरण

Showing of 1 - 14 from 65 results
VIDEO : कोल्हापुरच्या 'होली क्रॉस'मध्ये युवा सेनेचा राडा

व्हिडिओJan 22, 2019

VIDEO : कोल्हापुरच्या 'होली क्रॉस'मध्ये युवा सेनेचा राडा

कोल्हापूर, 22 जानेवारी : कोल्हापुरमधल्या 'होली क्रॉस' शाळेत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (22 जाने.) धुडघूस घालत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. शाळेकडून पालक आणि विद्यार्थ्यांना इमारत फी साठी सक्ती केली जात होती. त्याविषयीची नाराजी काही पालकांनी शाळा प्रशासनाकडे केली होती. पण शाळा प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे काही पालक ही बाब घेऊन युवासेनेकडे आले, त्यामुळे ही तोडफोड केल्याचं युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. यावेळी शाळेच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. मात्र, तात्काळ पोलीस दाखल झाल्यामुळे तणाव निवळला. याबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र शाळा प्रशासनाने आरोप फेटाळत इमारत फी ची सक्ती नसून, केवळ आवाहन केलं आहे आणि इच्छुकांनीच ती द्यावी असं शाळेनं स्पष्टीकरण दिलंय. तसंच तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी, अशीही मागणी शाळेकडून करण्यात आली आहे.

Live TV

News18 Lokmat
close