#स्त्री

Showing of 443 - 456 from 472 results
युएनमधलं करिअर (भाग - 2 )

बातम्याJan 16, 2009

युएनमधलं करिअर (भाग - 2 )

युएनएचसीआरमध्ये काम करणा-या रोहिणी देशमुख यांच्या मुलाखतीचा पुढचा भाग , ' युएनमधलं करिअर (भाग - 2 ) 'युएनसाठी काम करण्याची इच्छा असणा-या मुलांना युएनमधल्या ज्युनिअर फेलोशिपसाठी त्या त्या देशांकडून पाठवलं जातं. रोहिणी तुमच्यामागे अशी सुविधा नव्हती. मग तुमच्या युएनमधल्या कामाची सुरुवात कशी झाली ?रोहिणी देशमुख : लँकॅस्टर युनिव्हर्सिटीत ' पीस स्टडीज अ‍ॅण्ड कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन ' या विषयातून मास्टर्स डिग्री पूर्ण केल्यावर मी आंतराष्ट्रीय स्तरावरच्या सामाजिक संस्था आणि युएनएजन्सीजमध्ये कामाच्या अनुभवासाठी मी अर्ज केले. त्यांनतर युएनएचसीआरनं माझी निवड केली. त्यानंतर मी जिन्हिवातल्या युएनच्या मुख्य ऑफिसात 5 महिनं काम केलं. तिथे मला ट्रेनिंग देण्यात आलं. भारतातल्या कामाची पद्धत वेगळी असते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं वेगळं असतं. इथल्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथल्या वर्क एन्व्हायरमेंटशी जुळवून घ्यायचं असेल तर काय करायला हवं ?रोहिणी देशमुख : युएनसाठी काम करणा-या माणसाचा स्वभाव हा मनमोकळा असयला हवा. कारण तिथे वेगवेगळ्या देशांच्या नागरिकांबरोबर काम करावं लागतं. बरं प्रत्येकाची मत वेगवेगळी असतात. ती पटली नाही तरी ती शांतपणे ऐकण्याची तयारी असली पाहिजे. आपलं मत शांतपणे त्यांच्यासमोर मांडून आपला हेतू साध्य करायचा. या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. ' पोलिटिकली करेक्ट ' याचं महत्त्व युएनमध्ये काय असतं. आणि युएनसारख्या वर्क एन्व्हायरमेंटमध्ये त्याचा काय फरक पडतो ?रोहिणी देशमुख : ' पोलिटिकली करेक्ट ' म्हणजे ज्या आपल्या स्टिरिओटाईप आयडीयाज असतात, प्रत्येक देशातले काही डुज आणि डोण्टस असतात, आपण व्यक्तिगत पातळीवर काम करतो, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात तर त्यांच्याशी जुळवून घेऊन काम करावं लागतं. कामाचं वातावरण हे राजकीय स्वरूपाचं असतं. त्यामुळे बोलताना काम करताना जास्त काळजी घ्यावी लागते. आपण बैठकांमध्ये जे काही बोलतो ते युएनएचसीआरचं मत म्हणून प्रसिद्ध होतं. त्यामुळे जबाबदारीनं आणि समजून काम करावं लागतं.युएनचे अधिकारी म्हटल्यावर शशी थरुर आणि कोप्पी अन्नान या व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर येतात. समान्य मराठीमाणसाला तिथे जाण्याची काही संधी दिसत नाहीये. पण तुमचं शिक्षण महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावी झालेलं आहे. तुमच्या युएनमधल्या कामात तुम्हाला याचा काही फायदा झाला का ? रोहिणी देशमुख : बाबा पोलीस सर्व्हिसमध्येअसल्याने त्यांच्या दर दोन-दोन, तीन - तीन वर्षांनी बदली व्हायच्या. दर वेळेस आमची नव्यानं सुरुवात असायची. नवीन मित्र, नवी शाळा, नवे शिक्षक. सगळं काही नवं असायचं. तर या सगळ्या गोष्टींशी जुळवून घ्यावं लागायचं. त्यामुळे निरनिराळ्या प्रसंगांना तोंड देण्याची कुवत वाढत गेली. तुम्ही आफ्रिकेत काम करता, युएनच्या कामाच्या ट्रेनिंगसाठी निरनिराळ्या ठिकाणी जावं लागलं आहे. तर तिकडचे काही अनुभव सांगाल का ?रोहिणी देशमुख : माझ्याकडे क्रॉस कल्चरल अनुभव आहेत. लंडनमध्ये इंटरनॅशनल अलर्ट नावाची संस्था आहे. तिथे मी वर्षभरासाठी काम केलं आहे. ज्या एनजीओचा एक पायलट प्रॉजेक्ट आम्ही रशियामध्ये सुरू केला. प्रत्येक देशांमधल्या संवेदनशील भागांची माहिती गोळा करायची, त्या मािहतींचं विश्लेषण करायचं, त्या माहितीनुसार वेगवेगळे अहवाल तयार करायचे, हे सगळे अहवाल डिसिजन मेकर्स पर्यंत पाहोचवायचे... असं आमच्या कामाचं स्वरुप होतं. रशियामध्ये मॉस्कोमध्ये आमची सगळ्यांची एक बैठक झाली होती. सुरुवातीला माझ्याशी कोणी बोलत नव्हतं. कारण माझ्याबरोबरच्यांना मी ब्रिटिश असल्याचं वाटलं. टीब्रेक मध्ये जेव्हा त्यांनी चाय म्हणत माझ्यासमोर चहाचा कप पुढे केला तसा मी तो घेतला. त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी मला तुला कसं कळल्याचं विचारलं. तेव्हा मी त्यांना भारतीय असल्याचं सांगितलं आणि आमच्यामध्येही या पेयाला चहा म्हणतात असं सांगितलं. तसं सांगताच सगळं वातावरण बदललं. मला कित्येकांनी घरी येण्याचीही निमंत्रणं दिलीत. अशा करिअर्ससाठी अभ्यास तर करावाच लागतो. मग मानसिकता कशी असावी लागते ?रोहिणी देशमुख : वेगवेगळ्या मताचे लोक असतात, आपण पोलिटिकल एरियामध्ये काम करतो तेव्हा शांत डोकं ठेवून काम करावं लागतं. युएनसाठी काम करताना तुम्हाला असेही अनुभव आले असतील की ज्यांनी तुम्हाला बदलावं लागलं असेल... रोहिणी देशमुख : एक आल्बेनियन निर्वासित स्त्री जिनेव्हात आमच्या ऑफिसाठी काम करायची. आम्ही तिला मदत म्हणून ते काम दिलं होतं. तिच्यासमोर तिच्या पूर्ण कुटुंबाला मारलं होतं. तिच्यावरही अत्याचार झाले होते. त्या मानसिकतेतून तिला बाहेर काढण्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये क्लिनरचं काम दिलं होतं. तिची आणि माझी मैत्री झाली होती. रमझानच्या दिवसात ती रोझे ठेवायची. माझं काम झाल्यावर मला केकचा तुकडा देऊन ती नंतर ती स्वत: खाऊन उपवास सोडायची. अशा माणासांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी मी प्रयत्न करायचं ठरवलं.