#स्त्री

Showing of 352 - 365 from 456 results
सत्यमेव जयते इम्पॅक्ट;स्त्री भ्रूण हत्येचे खटले फास्ट ट्रक कोर्टात

बातम्याMay 11, 2012

सत्यमेव जयते इम्पॅक्ट;स्त्री भ्रूण हत्येचे खटले फास्ट ट्रक कोर्टात

11 मेमिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या रिऍलिटी शोच्या पहिल्याच भागाचा इम्पॅक्ट झाला आहेत. राजस्थानमधले स्त्री भ्रूण हत्येसंबंधीचे खटले आता फास्ट ट्रॅक करण्यात येणार आहेत. असा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. राजस्थानमध्ये गर्भ लिंग निदान करणार्‍या डॉक्टरांचं स्टिंग ऑपरेशन आणि गर्भ लिंग निदान समस्येबाबत 'सत्यमेव जयते' कार्यक्रमात दाखवण्यात आलं होतं. या खटल्यांची जलद सुनावणी व्हावी, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची विनंती आमिरने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोट यांना केली होती. त्यानंतर गहलोत यांनी हायकोर्टाच्या न्यायाधिशांशी चर्चा करून फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.