#सोनिया गांधी

Showing of 1067 - 1080 from 1085 results
स्वाभिमानी माणसं काँग्रेसला आवडत नाही-राणे

बातम्याDec 6, 2008

स्वाभिमानी माणसं काँग्रेसला आवडत नाही-राणे

6 डिसेंबर मुंबईनिलंबनानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी निलंबनाच स्वागत केलं आहे. काँग्रेसमधून निलंबन होणं ही एक शुभ घटना आहे असं कारण 1997 साली विलासरावांवर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली होती. आणि निलंबनातच त्यांची नेमणूक मुख्यमंत्री म्हणून झाली होती. असं ते म्हणालेदिल्लीतून अहमद पटेल आणि वर्षावरून विलासरावांनी माझ्याविरुद्ध षडयंत्र रचल्यामुळेच आपली मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाली नाही असं त्यांचं म्हणंण होतं. कारण अशोक चव्हाण यांना 32 आमदारांचा पाठिंबा होता तर माझी 48 आमदारांनी शिफारस केली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना चुकीची माहिती दिली गेली. विलासराव आणि काही उद्योगपतींनी मिळून माझी नेमणूक होऊ दिली नाही, कारण मी मुख्यमंत्री झालो तर राज्यातील अनेक भ्रष्टाचारांची प्रकरण बाहेर काढली असती, असं त्याचं म्हणणं होतं.मी काँग्रेसमध्ये गेलो नाही तर काँग्रेसमधल्या नेत्यांनीच मला बोलावलं असं सांगत त्यांनी विलासराव देशमुखांना टीकेचं लक्ष्य केलं. राज्यातलं सरकार अकार्यक्षम आहे, ते महाराष्ट्राला पुढे नेऊ शकत नाही. विलासरावांनी महाराष्ट्राला 20 वर्ष मागे नेलं आहे. पण स्वत: मात्र आर्थिकदृष्ट्या नंबरवन झाले आहेत.विलासरावांनी आपल्या फाउंडेशनमार्फत 1 कोटी 19 लाखांचा घोटाळा केला आहे. मार्च 2008मध्ये लेखापालांनी तयार केलेला अहवाल त्यांनी अजून सादर केलेला नाही. तसंच देशातील काही नेत्यांनी देश विकायला काढला आहे, असं ते म्हणाले. अनेक नेत्यांच्या छत्रछायेखाली अतिरेक्यांना मोकळं रानं मिळालं आहे, असा आरोपही त्यांनी या पत्रकार परिषदेत केला.आत्ताही राज्यातील 25 ते 30 आमदारांचा मला पाठिंबा असून मी मनात आणलं तर हे सरकार पाडूही शकतो.पण राज्यातील सद्याची स्थिती आणि जनतेच्या भावनांचा विचार करता मी हे कृत्य करणार नाही, असं त्यांनी सांगितलं.या आधी त्यांनी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर माझा विश्वास नाही, असं म्हटलं होतं. पण या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी , ए. के. अँथनी हे प्रामाणिक नेते आहेत, असं म्हटलं आहे. तसेच छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यावर आपला राग नाही, असंही स्पष्ट केलं. शेवटी त्यांनी आपण स्वत: प्रहाराच्या माध्यमाद्वारे विलासरावांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण वेळोवेळी बाहेर काढू असं सांगितलं.