04 फेब्रुवारी : आज जागतिक कर्करोग दिन...गेल्या काही महिन्यांमध्ये काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कॅन्सरचं निदान झालं. त्यापैकी काही जणांनी कॅन्सरशी यशस्वी झुंज दिली आणि कर्करोगमुक्त आयुष्य जगण्यास सुरुवात केली. बॉलिवूडमधील साठच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मुमताझ, सुप्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईराला, लिसा रे आणि सोनाली बेंद्रे यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. या सर्व अभिनेत्रींनी कॅन्सरशी दोन हात करून लढा दिला.