#सुषमा स्वराज

Showing of 469 - 482 from 486 results
देशात महिलाराज!

बातम्याMar 8, 2010

देशात महिलाराज!

आशिष दीक्षित, दिल्ली8 फेब्रुवारी सध्याच्या लोकसभेत फक्त 11 टक्के महिला असल्या, तरी देशातील अनेक महत्त्वाच्या पदांवर महिला विराजमान आहेत. अगदी राष्ट्रपतींपासून ते विरोधी पक्ष नेते पदापर्यंत. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरवातीला जेव्हा राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे आगमन झाले तेव्हा संसदीय परंपरेत एक नवा अध्याय लिहिला जात होता. कारण 15व्या लोकसभेच्या या अधिवेशनात महत्त्वाच्या 4 पदांवर महिला आहेत. अधिवेशनाची सुरुवात झाली देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील यांच्या अभिभाषणाने.अभिभाषणानंतर कामकाज सुरू झाले...लोकसभेच्या स्पीकर आहेत देशातल्या पहिल्या महिला स्पीकर मीरा कुमार. गेल्या वर्षी पंधरावी लोकसभा अस्तित्वात आल्यावर मीरा कुमार यांची एकमताने स्पीकर म्हणून निवड झाली होती.मीरा कुमार यांचे नाव स्पीकर म्हणून पुढे आणणार्‍या महिलाच होत्या. त्या होत्या यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी. फोर्ब्स मॅगझिननुसार सोनिया गांधी या जगातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत आहेत.यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या तिसर्‍या दिवशी रेल्वे बजेट मांडले तेही देशातील पहिल्या महिला रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी.आणि विरोधी पक्षाचा आवाज बुलंद केला तोही एका महिलेनेच. रेल्वे बजेटच्या दुसर्‍या दिवशी महागाईच्या चर्चेला सुरुवात करत, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.. चार अतिशय महत्त्वाच्या अशा पदांवर महिला असल्या तरी या लोकसभेत जेमतेम 11 टक्के महिला आहेत. पण हे चित्र कदाचित महिला आरक्षण विधेयकामुळे बदलू शकेल.