#सुभाष देसाई

Showing of 300 - 313 from 349 results
रेसकोर्सचा निर्णय सर्वसंमतीने घेणार -मुख्यमंत्री

बातम्याJun 13, 2013

रेसकोर्सचा निर्णय सर्वसंमतीने घेणार -मुख्यमंत्री

मुंबई 02 जुन : रेसकोर्सच्या जागेचा कोणताही निर्णय घेण्याआधी सर्वसंमती घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. आजमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत महापौर सुनील प्रभू, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, तसंच शिवसेनेचे नेते सुभाष देसाई उपस्थित होते. 40 मिनिटं ही बैठक चालली. या जागेवर थीम पार्क उभं करावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. तसंच त्याविषयीचा आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर केला. या विषयावर राजकारण न आणता हा प्रकल्प व्हावा अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.