#सीबीआय अटक

VIDEO : ममता बॅनर्जी यांचं धरणं आंदोलन अखेर मागे

देशFeb 5, 2019

VIDEO : ममता बॅनर्जी यांचं धरणं आंदोलन अखेर मागे

05 फेब्रुवारी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी अखेर आपलं धरणं आंदोलन मागे घेतलं आहे. ममता बॅनर्जी यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. सीबीआय विरुद्ध कोलकता पोलीस या नाट्यानंतर कोलकत्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी 'संविधान वाचवा' धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. ममतांच्या या आंदोलनाला देशभरातल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, मायावती, अखिलेश यादव यांचा समावेश होता. दरम्यान, कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआय अटक करू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं सीबीआयला बजावलं आहे. पण त्याचवेळी, कुमार यांनी सीबीआयला सहकार्य करावं, असंही कोर्टानं म्हटले आहे. 'हा आमचा नैतिक विजय आहे, असं ममता बॅनर्जींनी जाहीर केलं होतं.

Live TV

News18 Lokmat
close