सिंधुदुर्ग

Showing of 664 - 677 from 736 results
शिक्षणसेवक पदांवरील स्थगिती उठवण्याचे आदेश

बातम्याSep 23, 2010

शिक्षणसेवक पदांवरील स्थगिती उठवण्याचे आदेश

23 सप्टेंबरजिल्हा परिषदेने शिक्षण सेवकपदांवरची स्थगिती उठवावी, असा आदेश राज्य सरकारने, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला दिला आहे. येत्या आठ दिवसांमध्ये कारवाई करावी, अशा आदेशाचे पत्र, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला मिळाले आहे. त्यामुळे शिक्षणसेवक भरतीचा मार्ग आता मोकळा होण्याची चिन्हे आहेत.स्थानिकांनाच प्राधान्य मिळाले पाहिजे, या मुद्यावरून रत्नागिरीमध्ये राजकीय पक्षांनी शिक्षणसेवक भरती उधळून लावली होती. त्याचा फटका राज्यभरातल्या उमेदवारांना बसला होता. त्यावर अशा प्रकारे भूमिका घेता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केले होते. मूळ गुणवत्ता यादीनुसारच भरती करण्याचे आदेश जिल्हा परिषदांना सरकारने दिले आहेत. त्यामुळे स्थानिक शिक्षण सेवक संताप व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading