सार्वजनिक बांधकाम मंत्री

Showing of 222 - 235 from 267 results
ढाक्कुमाक्कुम... ढाक्कुमाकुम..!

बातम्याAug 10, 2012

ढाक्कुमाक्कुम... ढाक्कुमाकुम..!

10 ऑगस्टगोविंदा आला रे...आला...जरा मटकी सांभाल बिरजबाला...,गो..गो..गोविंदा, अटके झटके मारे है तु.. तु आज शोला तो हम भी फुंवारे है..,चांदी की डाल पे सोने का मोर...,मच गया शोर सारी नगरी में...अशा गाण्यांचा ठेका धरत आणि काळजाचा ठोका चुकवेल असा थरार 'याची देही याची डोळा' असा दहीहंडीचा उत्सव महाराष्ट्रवासीयांनी अनुभवला...गोविंदाच्या 'अजोड' जिद्दीचा अदभूत नजारा पाहुन सर्वच जण थक्क झाले. कुठे सहा थर लागले तर कुठे नऊ थर असा अदभूत उत्सव मुंबईसह राज्यभरात मोठ्या जल्लोषात साजरा झाला आहे. बॉलिवूडच्या स्टार मंडळींनीही गोविंदाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष हजेरी लावली. शिवसाई मंडळाने लावले 9 थरमुंबईतील शिवसाई मंडळाने 9 थर लावत रेकॉर्ड केला आहे. याची नोंद लिमका बुकमध्ये झाली आहे. ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत हे थर लावले. त्यांना 11 लाख आणि स्मृतीचिन्ह असं देण्यात आलं. त्याचबरोबर 9 थर रचून पुन्हा एकदा जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने विक्रम केला आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते 15 लाखाचं पारितोषिक देऊन मंडळाचा गौरव केला आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यास नाना पाटेकर यांचा पाठिंबामनसेचे आमदार राम कदम यांच्या घाटकोपरमधल्या दहीहंडीच्या ठिकाणी अभिनेता नाना पाटेकर आले होते. यावेळी त्यांनी गोविंदाचा आपल्या स्टाईलमध्ये उत्साह वाढवला. दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळावा या मागणीला नाना पाटेकरांनी पाठिंबा दिला आहे. पुण्यातील स्फोटाबद्दल बोलतांना, पोलीस देखील माणूस आहे, त्यामुळे पोलिसांना सर्व गोंविदा पथकांने सहकार्य करावं अस आवाहनही नानानं केलं. प्रदूषणविरहीत दहीहंडीदादरमध्ये दरवर्षी गाजते ती सेलिब्रिटींची दहीहंडी...याहीवर्षी स्ेालिब्रिटींनी जन्माष्टमीचा हा सोहळा, यावर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहयोगाने या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण देशभरातील ही एकमेव प्रदूषणविरहीत दहीहंडी असल्याचा दावाही आयोजकांनी केला. हा प्रदूषणविरहीत सोहळा मराठी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत साजरा झाला. सेलिब्रिटींची हजेरीठाण्यात संस्कृती दहीहंडीचा उत्साह वाढतोय. या दहीहंडीसाठी अभिनेता अक्षयकुमार उपस्थित होता. तर वरळीतल्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीसाठी अभिनेत्री इशा देओलची खास उपस्थिती होती. तिनं यावेळी भरतनाट्यम सादर केलं. अभिनेते जितेंद यांनीही हजेरी लावली. त्याचबरोबर राखी सावंत,इमरान हाश्मी आदी कलाकारांनी दहीहंडीला उपस्थित होते.पुण्यात चोख बंदोबस्तपुण्यात बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीसाठी विशेष खबरदारी घेण्यात येतेय. सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मैदानावर दहीहंडी साजरी करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं होतं. पण इतक्या कमी वेळात दहीहंडी दुसरीकडे हलवणं शक्य नाही, असं मंडळांचं म्हणणंय. त्यामुळे पुण्यातल्या रस्त्यांवर दहीहंडीचा उत्साह दिसतोय. स्त्री भ्रूण हत्या थांबवा ! स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली. महिलांना विशेष आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणीही यावेळी प्रकाश सुर्वे यांनी केली. दहीहंडी उत्सवाला हजारो गोविंदांनी हजेरी लावली सोबतच बॉलिवुडचे स्टार्सही सहभागी झाले होते. हंडी फोडणा-या पथकाला 21 लाखांचं रोख बक्षीस देण्यात आले आहे.निळ्या रंगाची दहीहंडी महाराष्ट्रात आज सगळीकडे लाल रंगाची दहीहंडी दिसत असताना नवी मुंबईत यावर्षी एका मंडळानं वेगळाचं प्रयोग केला. या मंडळाने निळ्या रंगाची दहीहंडी बांधली आहे.समता , एकता आणि बंधुतेच प्रतिक असलेल्या या हंडीचे स्वागत नवी मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात केलंय. आर पी आय नेते महेश खरे यांच्या मित्रमंडळाने या हंडीचं आयोजन केलं आहे. आर पी आय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी या हंडीच्या ठिकाणी भेट दिली.स्त्री भ्रूण हत्येला विरोध करत एकात्मतेचा संदेश देणारी ही हंडी अनेक अर्थानं वेगळी आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading