#सायन

Showing of 209 - 222 from 244 results
डॉक्टर संपावरच ; रुग्णांचे हाल

बातम्याSep 9, 2011

डॉक्टर संपावरच ; रुग्णांचे हाल

09 सप्टेंबरसरकारी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा संप आता चिघळला. मुंबईमधील 2150 डॉक्टर्स संपावर गेले आहेत. मार्डचे डॉक्टर आणि बीएमसी प्रशासनाची बैठक निष्फळ ठरली आहे. मार्डच्या मागण्या महापालिका प्रशासनाने अमान्य केल्या आहे. त्यामुळे संप सुरुच आहे. या संपाचा परिणाम आता दिसायला लागले आहे. अनेक शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहे. यामध्ये मुंबईच्या सतराशे आणि जेजे हॉस्पिटलमधल्या साडेचारशे डॉक्टरांचा समावेश आहे. सायन हॉस्पिटलमध्ये एका 10 महिन्यांच्या मुलीचा न्युमोनियामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांनाच मारहाण केली. यात एका डॉक्टरचा पाय फ्रॅक्चर झाला होता. या मारहाणीविरोधात डॉक्टर्स संपावर गेलेत. आपल्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी , अशी या डॉक्टर्सची मागणी आहे. तसेच हल्ल्याची चौकशी समितीमार्फत लवकरात लवकर करावी अशी मागणीही आज झालेल्या बैठकीत करण्यात आली. पण डॉक्टरांच्या कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Live TV

News18 Lokmat
close