#सातारा

Showing of 92 - 105 from 190 results
SPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका?

महाराष्ट्रFeb 23, 2019

SPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका?

किरण मोहिते, 23 फेब्रुवारी : साताऱ्यात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या दिलजमाईनंतर आता उदयनराजेंना ठसका लागण्याची वेळ आली आहे. कारण, शिवेंद्रराजेंनी भाजपच्या संभाव्य उमेदवारासोबतच मिसळीवर ताव मारला. वसंत जोशी यांच्या मालकीचं हे हॉटेल...वसंत जोशी म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर कार्यकर्ते...नुसते कट्टरच नाहीत तर उदयनराजेंच्या गोटातून नगरसेवकपदासाठी त्यांनी निवडणूकही लढवली. उदयनराजेंच्या कट्टर निष्ठावंताच्या याच हॉटेलमध्ये त्यांच्याच विरोधातली निवडणुकीची मिसळ तयार झाली आणि ती तयार केली उदयनराजेंचेच धाकटे बंधू शिवेंद्रराजेंनी. सकाळी नरेंद्र पाटील आणि आणि शिवेंद्रराजे भोसले आलिशान गाडीतून आले .गाडीचं सारथ्य शिवेंद्रराजेंनीच केलं. हॉटेलमध्ये मिसळची ऑर्डर दिली गेली आणि दोघांनीही त्याच्यावर चवीनं ताव मारला.