#सातारा

Showing of 1 - 14 from 194 results
पुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज

व्हिडीओOct 22, 2019

पुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज

मुंबई, 22 ऑक्टोबर : महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढचे 3 ते 4 दिवस पावसाचे असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. खासकरुन कोकणपट्ट्यातील सहाही जिल्ह्यांसह पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये उद्या दिवसभर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 23 तारखेला म्हणजेच उद्या खासकरुन कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 24 ऑक्टोबरलाही मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस तर विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 25 तारखेला म्हणजेच शुक्रवारीही विदर्भ आणि कोकणात परतीच्या पावसाचा जोर राहील.