#सातारा

Showing of 1145 - 1158 from 1234 results
खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल

बातम्याOct 23, 2011

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल

23 ऑक्टोबरराष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सातार्‍यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील दोन अधिकार्‍यांना मारहाण आणि दमदाटी केल्याप्रकरणी उदयनराजेंवर गुन्हा दाखल झाला आहे. शिपाईपदावर तिघांना भरती करुन घ्यावं यासाठी गेले सहा महिने उदयनराजे जिल्हा मध्यवर्ती बँकेला सांगत होते. मात्र काल हे बँकेतील अधिकारी आपले ऐकत नाहीत. म्हणून बी श्रीधर आणि अंकुश नलावडे या अधिकार्‍यांना दमदाटी आणि मारहाण केल्याचा आरोप उदयनराजेंवर ठेवण्यात आला. रात्री उशीरा बँकेचे चेअरमन आणि माजी आमदार सदाशिव तात्या पोळ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची चौकशी करुन रात्री उशीरा उदयन राजेंवर गुन्हा दाखल करण्यात आला.