#सातारा

Showing of 1002 - 1015 from 1134 results
दरड हटवली, रघुवीर घाट सुरळीत

बातम्याJun 16, 2012

दरड हटवली, रघुवीर घाट सुरळीत

16 जूनरत्नागिरी - सातार्‍याला जोडणार्‍या रघुवीर घाटात आज सकाळी आठच्या सुमारास दरड कोसळली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर तब्बल आठ तासांनंतर ही दरड बाजूला करण्यात यश आलंय. आता घाट सुरळीत सुरू झाला आहे. पण पुन्हा दरड कोसण्याचा धोका कायम आहे. आज सकाळी जेव्हा ही दरड कोसळली होती त्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या पंधरा गावांचा संपर्क तुटला होता. या गावांतून दळणवळणासाठीचा हा एकमेव रस्ता असल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दरड बाजूला करून घाट सुरू केल्यानं हा संपर्क आता पूर्ववत झाला आहे.