News18 Lokmat

#सातारा

Showing of 846 - 859 from 1016 results
रजिस्टर पद्धतीने लग्न करून दुष्काळग्रस्तांना केली मदत

महाराष्ट्रMay 2, 2013

रजिस्टर पद्धतीने लग्न करून दुष्काळग्रस्तांना केली मदत

02 मे 2013सातारा : महाराष्ट्र दुष्काळाच्या धगीत होरपळतोय. पण या धगीवर आपल्या परीने फुंकर घालायचा प्रयत्नदेखील अनेकजण करत आहेत. जिल्ह्यातल्या फलटण मधल्या दुष्काळी भागातल्या तीन मित्रांनी अनोखा पायंडा पाडला. आपल्या लग्नसोहळ्यावर होणार अवास्तव खर्च टाळून श्रीकांत खटके आणि त्याच्या 3 मित्रांनी दुष्काळग्रस्त भागाला मदत केली. या तरूणांनी अगदी साध्या पध्दतीने रजिस्टर लग्न केलंय. या लग्नावर होणार्‍या खर्चाच्या पैशातून या नव दाम्पत्यांनी दुष्काळग्रस्त भागातल्या जनावरांसाठी चारा पाठवून दिला आहे. तसंच लग्नात होणार्‍या खर्चाचं आजही मुलीच्या आईवडिलांना सतत टेन्शन असतं, त्यामुळेच अशा प्रकारे लग्न करण्यात जर तरूणांनी पुढाकार घेतला तर मुलीच्या आईवडीलांचंही टेन्शन कमी होऊ शकतं असं मतही नव दाम्पत्यांनी व्यक्त केलं.