#सातारा

Showing of 404 - 414 from 414 results
मनसे कार्यकर्त्यांकडून 'टोल'फोड सुरुच

बातम्याJun 13, 2012

मनसे कार्यकर्त्यांकडून 'टोल'फोड सुरुच

13 जूनअवैध टोलवसुलीविरोधात मनसेनं आंदोलन तीव्र केलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आज ठिकठिकाणी आंदोलन केलं. नवी मुंबईत वाशी हायवेवर असलेल्या टोलनाक्यावर आज आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर जोरदार घोषणाबाजी केली आणि टोलनाका बंद करण्याचा प्रयत्न केला. या सर्व मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-अहमदाबाद हायवेवर वसईजवळचा खानिवडे टोलनाक्यावर हल्लाबोल केला. टोलनाक्याची तोडफोड करुन बंद पाडला. त्याचबरोबर नाशिक-औेरंगाबाद रस्त्यावर शिलापूर टोलनाक्यावर मनसेनं आंदोलन केलं. शिलापूर टोलनाका मनसेनं बंद पाडला आणि तिथं तोडफोड केली. मनसेचे स्थानिक आमदार वसंत गीते यांना अटक करण्यात आली आहे. तर जवळपास 150 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. मनसे महिला आघाडीनं बंद पाडलाटोल नाकापुणे सातारा रस्त्यावरील खेड - शिवापूर टोल नाका मनसे महिला आघाडीनं बंद पाडला. पालिकेतील मनसेच्या नगरसेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत टोल घेण्याला विरोध केला आणि वाहनांना टोल देण्यास मनाई केली. शेवटी पोलिसांनी परिस्थिती शांत करण्यात यश मिळवलं.ऑक्टोबर 2010 रोजी ही टोल वसुली सुरू झाली. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी या मार्गावर सहा पदरी रस्ता , सर्विस रोड, उड्डाण पूल तयार करतंय. जवळपास 1700 कोटी रूपये बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर खर्च करणात येणार असून 24 वर्ष टोस वसुली करून हा खर्च वसूल केला जाणार आहे. मनसेनं मात्र रिलायन्स कंपनीच्या अधिकार्‍यांना टोल वसुली कायमची बंद करा असा सज्जड दम भरला. तर औरंगाबादमध्ये औरंगाबाद -जळगाव हायवेवर हर्सुल सावंगी टोलनाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांची तोडफोड केली. यावेळी 200 मनसे कार्यकर्त्यांचा जमाव टोलनाक्यावर धडकला आणि त्यांनी हा टोलनाका अनधिकृत टोलवसुली करत असल्याचा आरोप करत त्यानी हा टोल नाका बंद पाडला.

Live TV

News18 Lokmat
close