#साजरा केला जातो

Showing of 1 - 14 from 17 results
VIDEO : नवनीत राणांचा धम्माल दांडिया डान्स

व्हिडिओOct 3, 2018

VIDEO : नवनीत राणांचा धम्माल दांडिया डान्स

संजय शेंडे, अमरावती, 03 आॅक्टोबर : येत्या १० तारखेला घटस्थापना अर्थात दुर्गा देवीच आगमन होणार आहे. या नऊ दिवसांपर्यंत संपूर्ण देशात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळते तर दुसरीकडे सगळीकडे या काळात दांडिया मोठ्या प्रमाणात खेळला जातो. याच दांडियाच प्रशिक्षण सुरू असून यावेळी आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी हजेरी लावली. अमरावती शहरात दुर्गादेवी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याचवेळी अमरावती शहरात देखील विविध ठिकाणी दांडियाच आयोजन केल्या जाते ज्याला मोठा प्रतिसादही मिळतोय..आता याच दांडियाचे प्रशिक्षण शहरात विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे. हाॅटेल महफिलच्या गार्डनमध्ये मोठ्याप्रमाणावर महिलांचं दांडिया प्रशिक्षण सुरू असून यामध्ये काल रात्री अमरावतीच्या लोकसभेच्या उमेदवार, आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी हजेरी लावली आणि त्यांनी सुद्धा यावेळी धम्माल दांडिया डान्स केल्याने उपस्थितांचे डोळे चक्रावून गेले आणि महिलांचा उत्साह द्विगुणीत झाला. यावेळी नवनीत राणा यांनी विविध प्रकारचे स्टेप केल्या.

Live TV

News18 Lokmat
close