#सांगली

Showing of 27 - 40 from 257 results
भाजप नेत्यांची गुंडगिरी, पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना मारहाण

व्हिडीओAug 13, 2019

भाजप नेत्यांची गुंडगिरी, पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना मारहाण

आसिफ मुरसल, हरीपूर, 13 ऑगस्ट : मंत्र्यांचा सेल्फी असो किंवा धान्यावर पोस्टरबाजी हे कमी होत नाही तेच आता भाजपच्या नेत्यांनी पूरग्रस्त भागात गुंडगिरी करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मराठा सेवा संघाच्या वतीने गेल्या 9 दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी छावणी सुरू आहे. आज या ठिकाणी भाजपच्या नगरसेविका गीता सुतार आणि त्यांच्या गुंडांनी येऊन मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुंडांच्या मारहाणीत एका महिला पत्रकारालाही धक्काबुक्की झाली आहे. या नगरसेविकाने या मदत छावणीमध्ये काही मिळत नाही. असं सांगण्याचा दबाव लोकांवर टाकत होती. पण लोकांनी याला नकार दिला.