#सांगली

Showing of 235 - 248 from 253 results
स्वखर्चातून उभारली 2500 जनावरांसाठी चारा छावणी

बातम्याMar 16, 2013

स्वखर्चातून उभारली 2500 जनावरांसाठी चारा छावणी

बालाजी निरफळ, उस्मानबाद 16 मार्चउस्मानाबाद जिल्ह्यातील उमरागा तालुक्यात कवठा येथे सेवाग्राम संस्थेने शासनाच्या मदतीशिवाय स्वखर्चातुन 2500 जनावरांसाठी चारा छावणी सुरु केली आहे.या चारा छावणीमुळे दुष्काळात होरपळणार्‍या जनावारांना मोठा आधार बनली आहे. सेवाग्राम संस्था या दुष्काळी परिस्थीतीत काम करणार्‍या सेवासंस्थांकरिता आदर्श ठरली आहे.दुष्काळाच्या या भयानक चक्रात शेतकर्‍यांबरोबर जनावरांनाही चटके सोसावे लागत आहेत. पण या जनावरांच्या तोंडी चारा भरवण्याचं काम करतेय उस्मानाबादमधली सेवाग्राम संस्था. कवठा येथे गेल्या दीड महिन्यापासुन या संस्थेनं स्वखर्चानं चारा छावणी सुरु केलीय. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय. या दुष्काळी परिस्थितीत सरकारच्या मदतीवर अवलंबुन न राहता, शिवाय कोणतीही अपेक्षा न ठेवता जनावरांसाठी मदत करण्याची इच्छा असल्याने ही चारा छावणी सुरू करण्यात आलीय. या चारा छावणीच्या माध्यमातून आत्तापर्यंत अडीच हजार जनावरांना आधार मिळालाय. या छावणीत लातूर, सांगली, बीड या जिल्ह्यामध्येही शेतकरी आपली जनावरं घेऊन आलेत. सेवाग्राम संस्थेचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. हीच प्रेरणा घेऊनआणखी काही संस्था दुष्काळात कामं करण्याकरता पुढे आल्या तर दुष्काळग्रस्तांना मोठी मदत मिळेल.