#सर्पमित्र

Showing of 1 - 14 from 19 results
VIDEO: जीवाची बाजी लावत विहिरीतून सुखरूप बाहेर काढला विषारी कोब्रा

बातम्याNov 30, 2018

VIDEO: जीवाची बाजी लावत विहिरीतून सुखरूप बाहेर काढला विषारी कोब्रा

लातूर, 30 नोव्हेंबर : पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या एका कोब्रा जातीच्या विषारी सापाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. लातूर तालुक्यातल्या सोनवती गावातील एका शेतात असलेल्या विहिरीत गेल्या दोन दिवसांपासून कोब्रा जातीचा साप पडला होता. विहिरीला पायऱ्या नसल्याने प्रयत्न करूनही त्या सापाला बाहेर पडता येत नव्हतं. याची माहिती गावकऱ्यांनी सर्पमित्र प्रशांत जोजारे यांना कळवली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीनं विहिरीत दोरखंड बांधून बाजेच्या साहाय्यानं प्रशांत जोजारे यांनी मोठ्या शिताफीनं या सापाला बाहेर काढलं. दरम्यान विहिरीतून बाहेर आणताना खवळलेल्या सापाने अनेकवेळा सर्पमित्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा थरार बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका उडाला. मात्र मोठी कसरत करून शिताफीनं सापाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close