सरपंच Videos in Marathi

Showing of 27 - 28 from 28 results
हिरव्यागार गावाची गोष्ट (भाग : 2 )

बातम्याMay 13, 2013

हिरव्यागार गावाची गोष्ट (भाग : 2 )

जलसंधारणाचं काम सुरू झालं तेव्हा गावाचं माळरान ओसाड होतं. पहावं तिथे खडक आणि उजाड डोंगर होते. हिवरे गावाच्या माळरानाला हिरवंगार करण्यासाठी सरकारी योजना वापरली गेली. 1993- 94 मध्ये वनविभागाचं काम सुरू झालं. वनव्यवस्थापन समिती स्थापन केली. त्यात डोंगरावर चर खणले गेले. जूनमध्ये पाऊस पडला. चारा आला. इथेच माथ्यापासून पायथ्यापर्यंत काम सुरू झालं. गावपातळीवर पाण्याची साठवण आणि समान वाटप हे लोकांच्याच सहभागातून झालं आहे. त्यासाठी लोकांनी स्वत:साठी नियम केले गेले. जसं- बोअरवेलचं पाणी शेतीसाठी घ्यायचं नाही. तर फक्त पिण्यासाठी वापरायचं. ऊस आणि केळी ही ज्यादा पाण्याची पिकं घ्यायची नाहीत. जनावरांचा चारा म्हणून अर्धा एकरवर ऊस लावायाचा भरपूर भाजीपाला ठिबक वापर करायचा. सगळ्यांनी मिळून पाण्यासोबत पिकाचंही नियोजन करायला सुरुवात केली. त्यामुळे पिकांचा पॅटर्न बदलत चालला आहे. ज्या शेतात फक्त ज्वारी बाजरी पेरली जायची तिथे आता जागा घेतली कांद्याने घेतली. कारण 19 95 अगोदर 80 फुटांवरून 180 फुटांपर्यंत पाण्याची पातळी असायची. तीच पाण्याची पातळी 30 ते 40-50 फुटांपर्यत आली. 2003 साली फक्त 89 मिमी पाऊस पडला. त्यावेळी दुष्काळ होता. 14 पैकी 9 पंपावर मारलं की पाणी यायचं. त्यामुळे या लोकांनी पिकांच्या आणि पर्यायानं पाण्याच्या नियोजनाला सुरुवात केली. हिवरेबाजारमध्ये जसा पाण्याचा खळखळाट वाढत होता. तसा सरकारी योजनांचा ओघही वाढत होता. राज्यसरकारची आदर्श गाव प्रकल्प योजना 1995पासून गावात सुरू झाली. 1 लाख 34 हजाराचं आदर्श ग्राम योजनेचं पहिलं काम गावात आलं. पण पैशाच्या वाटाघाटींमुळं ते काम साधारण वर्षंभर तरी बंद पडलं. सरपंच म्हणून पोपटराव पाटीलांवर अविश्वासाचा ठराव आला. पैसा कसा येतो- जातो. पण अशा भांडणांनी गावांचं नुकसान होतं हे पटवून दिल्यावर हिवरे गावातले गावकरी भानावर आले. तेव्हा गावाने पाण्याचा ताळेबंद करण्याचं काम सुरू केलं. गावातल्या स्थानिक ज्ञानाला भूजल विकास यंत्रणेची जोड मिळाली. जसं 100 मिलीमीटर पाऊस पडला की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपतो. 200 मिलीमिटर झाला की खरीप पीक मिळतं. 300 मिलीमीाटरपर्यंत झाला कि रब्बीचं पीक घेता येतं. 300 मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस झाला तर एप्रिल-मे मध्येही 500 ते 600 एकरवर शेती करता येते. 2 वर्षांपूर्वी पाऊस जास्त तर गहू ज्यादा घेतला होता. कांदा- बटाटा जास्त झाला. यंदा पाऊस कमी झाल्याने गव्हाचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र कांदा आणि भाजीपाला जास्त आहे. गावात ठिबक सिंचन मोठ्या प्रमाणावर आहे. मातीत पडणारा एकेक थेंब इथे संपत्तीच्या रुपाने साठून राहतो. ही संपत्ती खासगी असली तरी ती या खेडेगावाच्या बाहेर जात नाही. इथे शेताला कुंपण नाही. गाई-गुरं येतील आणि पिकं खातील याची शेतकर्‍यांना भीती वाटत नाही. कारण गावात चराईबंदी आहे. त्यामुळे गावचं नुकसान होत नाही. कारण गावात गुरांना बाहेरून चारा आण्‌ून दिला जात आहे. गावात गोबरगॅसचा वापर होत आहे. आता तर चुलीच्या धुरामुळं डोळ्यांना आणि आरोग्याला होणार त्रास पाहता गावात फंुकणी बंद मोहीम सुरू झाली आहे. गावातली गरीब आणि श्रीमंतांमधली दरी कमी होतं आहे. त्यासाठी गावातली जमीन गावातल्याच भूमीहिनांना देण्यासाठी भपूर प्रयत्न केले जात आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading