#सरपंच

Showing of 196 - 209 from 220 results
युनिक आयडेंटीचा मान टेंभली गावाला

बातम्याSep 28, 2010

युनिक आयडेंटीचा मान टेंभली गावाला

दीप्ती राऊत, नंदुरबार28 सप्टेंबरनंदुरबारमधल्या आदिवासी, अतिदुर्गम टेंभलीकडे पूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. युनिक आयटेंडिफिकेशन कोड या क्रांतीकारी योजनेला पंतप्रधानांच्या हस्ते या भागातून सुरुवात होत आहे. गावाच्या सरपंच छबडीबाई सोनावणे यांना पहिल्या रहिवाशाचा मान मिळण्याची शक्यता आहे. 100 टक्के भिल्ल आदिवासी आसलेल्या या गावातील 90 टक्के लोक भूमीहीन शेतमजूर आहेत. पोटासाठी गुजरातमध्ये जाऊन उसतोडी, हाच त्यांच्या जगण्याचा आधार. इतर वेळी 50 रुपयांच्या मजुरीवर कशीबशी गुजराण करावी लागते. पण येथील गावकर्‍यांना काही महिन्यांपासून रोजगार हमीची मजुरीही मिळालेली नाही. पिण्याचा पंप बंद पडला आहे. पोटासाठी स्थलांतर आणि पाण्यासाठी वणवण हे हाल तर गेल्या कित्येक पिढ्यांपासूनचे. म्हणूनच त्यांना अपेक्षा आहे ती देखाव्याच्या पलिकडे जाऊन खरा विकास यांच्यापर्यंत पोहोचण्याची.आधार योजनासुद्धा गरिबीतून बाहेर पडण्यासाठी आधार ठरावी, हीच त्यांची निव्वळ अपेक्षा आहे.