#सरपंच

Showing of 157 - 170 from 226 results
सतेज पाटील-महादेवराव महाडिक गटात तुंबळ हाणामारी

बातम्याNov 24, 2012

सतेज पाटील-महादेवराव महाडिक गटात तुंबळ हाणामारी

24 नोव्हेंबरकोल्हापूर जिल्ह्यातल्या पाचगावमध्ये आज सरपंच निवडीवरुन गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या काँग्रेसमधल्या 2 नेत्यांमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पाचगावमध्ये आज सरपंच निवड होती. त्यावेळी या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातलीला वाद झाला. आणि त्याचं रुपांतर हाणाामारीत झालं. यावेळी जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. पण संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक केली. यावेळी पाचगावमध्ये रस्त्यावर अक्षरशः दगडांचा खच पडला होता. त्यामुळं पाचगावच्या आजच्या संरपंच निवडीला गालभोट लागलं. अखेर या हाणामारीतचं सतेज पाटील गटाच्या राधिका खडके यांची सरपंच पदी निवड झाली. या निवडीनंतर सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.