#समाज

Showing of 1 - 14 from 781 results
VIDEO : 'सरकार आपल्याला फसवण्याच्या तयारीत', आरक्षणावरुन धनगर नेते आक्रमक

मुंबईFeb 22, 2019

VIDEO : 'सरकार आपल्याला फसवण्याच्या तयारीत', आरक्षणावरुन धनगर नेते आक्रमक

मुंबई, 22 फेब्रुवारी : आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा धनगर समाजाची बोळवण केल्याचा आरोप होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे धनगर समाजाचं शिष्टमंडळ घेऊन वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यावेळी आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर आरक्षणाची केंद्राला शिफारस करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मात्र मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा फक्त आश्वासन देऊन बोळवण केली असं म्हणत शिष्टमंडळानं नाराजी व्यक्त केली. दरम्यान आरक्षणाचा मुद्दा लवकर निकाली काढला नाही तर धनगर समाज मुंबईत मोठा मोर्चा काढून आंदोलन छेडेल असा इशाराही शिष्टमंडळातील सदस्यांनी दिला आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी या समाजाची जुनी मागणी आहे.

Live TV

News18 Lokmat
close