#सबसिडी

Showing of 105 - 111 from 111 results
कृषीकर्जासाठी 4,75 000 कोटी रुपयांची तरतूद - मुखर्जी

बातम्याFeb 28, 2011

कृषीकर्जासाठी 4,75 000 कोटी रुपयांची तरतूद - मुखर्जी

28 फेब्रुवारीकेंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आज 2011 -12 या आर्थिक वर्षाचं बजेट सादर केलं आहे. युपीएचे अर्थमंत्री म्हणून प्रणव मुखर्जी यांचं हे तिसरं बजेट आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्य करदात्यांना दिलासा तर देण्यात आला आहे सोबत शेतकरी राजाला ही खुश करण्यात आलं आहे. चालू वर्षात अन्नधान्य उत्पादनावर विशेष भर देणार असल्याचं सांगत प्रणव मुखर्जी यांनी शेतीसाठी 4 लाख 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सांगितले आहे. शेतासाठीच्या अल्प मुदतीच्या कर्जावरील 7 टक्के व्याजदर कायम ठेवण्यात येणार आहे. तसेच वेळेत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना कर्जाच्या व्याजात तीन टक्के सूट देण्याची घोषणाही प्रणव मुखर्जी यांनी केली. - शेतकर्‍यांना 7% ने कर्ज मिळणार- 15 मेगाफूड पार्क उभारणार- धान्य साठवण्याची क्षमता वाढवणार- कोल्डस्टोरेजची संख्या वाढवणार- कोल्ड स्टोअरेजसाठी खास तरतूद- खतांवरची सबसिडी हटवणार.- युरियासाठी नवी खत प्रणाली.1 एप्रिल 2011 पासून लागू- अन्नधान्य उत्पादनावर भर देणार- डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी 300कोटी रूपयाची तरतूद - पशूसंवर्धासाठी चार्‍याचे उत्पादन वाढवण्यासाठी 300 कोटींची तरतूद - नाबार्डसाठी 3000 कोटी रूपयाची तरतूद- भाजीपाला उत्पादकांच्या उत्थानासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद - खते आणि रॉकेलवर कॅश सबसिडी देणार- तेलबियांच्या उत्पादनातही विक्रमी उत्पादन - या वर्षी अन्नधान्य मागिल वर्षीच्या तुलनेत विक्रमी येण्याची शक्यता - 61832 पाम आईलची शेती वाढवणार- शेतासाठीच्या अल्प मुदतीच्या कर्जावरील 7 टक्के व्याजदर कायम ठेवणार- सेंद्रीय शेतीला प्राधान्य देण्यासाठी सरकार पुढाकार घेणार- 24 कोल्डस्टोरेज प्रकल्पानां मान्यता- एपीएमसी कायद्याचा पुनरचना करण्याचे राज्य सरकारांना सुचना- कोल्डस्टोरेजची संख्या वाढवणार त्यासाठी खास तरतूद- धान्य साठवण्याची क्षमता 40 लाख टनांपर्यंत वाढवणार - धान्य साठवणूकीची क्षमता वाढवणार