#सचिन

Showing of 1 - 14 from 876 results
VIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली!

महाराष्ट्रJan 18, 2019

VIDEO : 'झोमॅटो'वरून आॅर्डर केली पनीर चिली, मिळाली रबर चिली!

सिद्धार्थ, गोदाम, 18 जानेवारी : औरंगाबाद शहरात एका ग्राहकाने 'झोमॅटो'वरून पनीर चिली मागवली असता त्याच्या घरी थेट फायबर चिली पोचली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत जिन्सी पोलीस ठाण्यात झोमॅटो आणि हॉटेलविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सचिन जगधडे असं तक्रार करणाऱ्या ग्राहकाचं नाव आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांनी झोमॅटो वरून पनीर चिली आणि इतर काही पदार्थांची ऑर्डर केली होती. मात्र, घरी आल्यानंतर जेवताना पनीर तुटत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर नीट निरखून पाहिलं असता, संबंधित पदार्थ हा पनीर नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर सचिन जगधडे यांनी एस स्क्वेअर या हॉटेल गाठून चौकशी केली असता हॉटेल चालकाने उडवा उडवीची उत्तरं दिली. त्यानंतर सचिन जगधडे यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Live TV

News18 Lokmat
close