#सचिन तेंडुलकर

Showing of 690 - 699 from 699 results
पावसामुळे चौथी वनडे 22ओव्हरची

बातम्याNov 23, 2008

पावसामुळे चौथी वनडे 22ओव्हरची

23 नोव्हेंबर बंगलोरभारत-इंग्लंडदरम्यान खेळल्या जाणा-या बंगलोर वनडेत भारतानं दमदार सुरुवात केली. भारताच्या खात्यात 82 रन्सची नोंद झाली असतानाच पावसानं हजेरी आणि खेळ थांबवण्यात आला. त्याआधी पहिली बॅटिंग करणा-या भारतीय डावाची सुरुवात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरनं या जोडीनं केली. पण सचिन तेंडुलकर फार काळ मैदानावर टिकला नाही. स्टुअर्ट ब्रॉडनं त्याला आऊट केलं. सचिननं दोन फोर मारत अकरा रन्स केले. पण यानंतर तिस-या क्रमांकावर खेळायला आलेल्या गौतम गंभीरच्या मदतीनं सेहवगानं फटकेबाजी सुरूच ठेवली. सेहवागने 61 रन्स करत आपल्या वनडे करियरमध्ये सहा हजार रन्सचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा सहावा बॅटसमन ठरला आहे. गंभीरने 30 रन्स केले. भारताच्या दृष्टीनं ही वनडे आणखी एका कारणासाठी महत्त्वाची ठरली आहे. भारताची ही 700वी वनडे आहे. दुस-यांदा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला त्यावेळी भारताचा स्कोर एक विकेटवर 106 रन्स इतका होता. पाऊस थांबल्यामुळे आता ही वनडे 22 ओवरची करण्यात आली आहे.