#सचिन तेंडुलकर

Showing of 677 - 690 from 692 results
रणजी विजेत्या मुंबई टीमचा सत्कार

बातम्याJan 23, 2009

रणजी विजेत्या मुंबई टीमचा सत्कार

22 जानेवारी मुंबईरणजी विजेत्या मुंबई टीमचा मुंबई क्रिकेट असोशिएशनतर्फे शानदार सत्कार करण्यात आला.मुंबईतल्या बांद्रा येथील एमसीएच्या सभागृहात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईनं हैदाराबाद येथे झालेल्या फायनलमध्ये उत्तर प्रदेशचा पराभव केला होता.रणजी विजेतेपद पटकावण्याची मुंबईची ही 38 वी वेळ आहे. वसिम जाफरच्या नेतृत्वाखाली मुंबईनं हा विजय मिळवला.मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि केंदि्रय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मुंबईच्या टीमचा शानदार सत्कार करण्यात आला. गौरव चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. सचिन तेंडुलकर मात्र वैयक्तिक कारणास्तव या सोहळ्यास उपस्थित राहू शकला नव्हता.यावेळी मुंबईच्या महिला टीमसहीत ज्युनियर टीमचाही सत्कार करण्यात आला.