#सचिन तेंडुलकर

Showing of 638 - 651 from 662 results
भारत आणि न्यूझीलंडची वन डे रद्द

बातम्याMar 6, 2009

भारत आणि न्यूझीलंडची वन डे रद्द

6 मार्च, वेलिंग्टन भारत आणि न्यूझीलंड दरम्यान वेलिंग्टन इथं सुरू असलेली वन डे पावसामुळे अखेर रद्द करण्यात आलीय. मॅचमध्ये तीनदा पावसाने व्यत्यय आला. अखेर 29 व्या ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर चार विकेटवर 188 रन्स इतका असताना मॅच रद्द करण्यात आली. रिपरिप पडणार्‍या पावसामुळे पीच बरोबरच आऊटफिल्डही खराब झालं होतं. त्यामुळे अंपायरनी अखेर मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागची हाफ सेंच्युरी हे भारतीय बॅटिंगचं वैशिष्ट्य ठरलं. पण त्यानंतर मात्र सेहवाग, तेंडुलकर आणि युवराज पाटोपाठ आऊट झाले.गौतम गंभीरही रन्स वाढवण्याच्या नादात आऊट झाला. तिसर्‍यांदा खेळ थांबला तेव्हा धोणी 23 आणि सुरेश रैना 13 रन्सवर खेळत होते. आता तिसरी वन डे येत्या रविवारी ख्राईस्टचर्चला होणार आहे.