Elec-widget

#संसद

Showing of 313 - 326 from 334 results
अफजल गुरुच्या फाशीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

बातम्याMay 27, 2011

अफजल गुरुच्या फाशीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

27 मेराष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी फाशीची शिक्षा झालेल्या दोन आरोपींच्या दयेची याचिका काल फेटाळली. त्यामुळे संसद हल्ल्यातला आरोपी अफजल गुरुच्या फाशीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. संसदेवरच्या हल्ल्याला 10 वर्षे झाली आहे. तरीही अफजल गुरुला फाशी द्यायची की नाही यावर अजून कोणताच निर्णय झाला नाही. फाशीच्या शिक्षेविरुद्ध त्यानं दाखल केलेली दयेची याचिका 2006 पासून गृहमंत्रालयाकडे पडून आहे. याच्या नेमका उलटा प्रकार देविंदर पाल सिंग भुल्लर याच्याबाबतीत घडला. प्रलंबित दयेच्या याचिकेवर त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आणि त्यानंतर केवळ चार दिवसांत त्याच्या भवितव्याचा निर्णय झाला. गेल्या आठ वर्षांपासून त्याची दयेची याचिका पडून होती. त्यामुळे मृत्यूची शिक्षा जन्मठेपेत बदलावी अशी याचिका त्याने कोर्टात दाखल केली होती. कोर्टाने हस्तक्षेप केल्यानंतर राष्ट्रपतींनी त्याच्या याचिकेवर लगेच निर्णय घेतला. भुल्लर याच्यासोबतच आसामच्या महेंद्र नाथची दयेची याचिकाही राष्ट्रपतींनी फेटाळली. भुल्लर याच्या दयेची याचिका केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली होती. अफजल गुरुची याचिका मात्र अजूनही गृहमंत्रालयातच पडून आहे. क्रमानुसारच दयेच्या याचिकांवर निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितलं होतं. पण भुल्लर याच्याबाबतीत तो नियम त्यांनी धाब्यावर बसवला. आता अफजल गुरुच्या याचिकेवर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपनं केली.