संप

Showing of 664 - 672 from 672 results
जकातीविरोधात कल्याण-डोंबिवलीतल्या व्यापार्‍यांचा संप

बातम्याNov 10, 2008

जकातीविरोधात कल्याण-डोंबिवलीतल्या व्यापार्‍यांचा संप

10 नोव्हेंबर, मुंबईअजित मांढरे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील व्यापार्‍यांनी जकातीविरोधात बेमुदत संप पुकारला आहे. 5 नोव्हेंबरपासून या व्यापार्‍यांनी आपली दुकानं बंद ठेवून आपला विरोध सुरू ठेवलाय. जोपर्यंत जकात हटवण्यात येत नाही तोपर्यंत हा बेमुदत बंद असाच सुरू राहील अशी घोषणाही व्यापार्‍यांनी केली आहे.या शहरातील व्यापार्‍यांनी रद्द झालेली जकात रद्द करावी यासाठी गेल्या पाच दिवसांपासून आपली दुकानं बंद ठेवली आहेत. ' जकात रद्द होईपर्यंत शांततामय मार्गाने आंदोलन सुरू ठेवू ' असा निर्धार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाघाडकर यांनी व्यक्त केला आहे.पण, पालिका एप्रिल महिन्यापर्यंत जकात हटवण्यास तयार नाही. कारण, जकातीबद्दल शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही आणि जकात हटवल्यास पालिकेला प्रचंड नुकसानाला सामोर जावं लागेल असं महापौरांचं म्हणण आहे. पालिकेला रोज 8 कोटी रूपये उत्पन्न जकातीतून मिळतं. तर वर्षाला 94 कोटी 56 लाख रूपये जकातीतून पालिकेच्या तिजोरीत जमा होतात. आणि जर तातडीने जकात हटवली गेली तर पालिकेला 45 ते 50 कोटींचा तोटा सहन करावा लागेल. ' जकातीवर पालिकेचं अंदाजपत्रक अवलंबून आहे. जकात रद्द केल्यास ते कोलमडून पडेल आणि विकासकामं खोळंबून रहातील. दहा टक्के व्यापार्‍यांसाठी आम्ही 90 लोकांचं नुकसान करू शकत नाही, असं कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर रमेश जाधव यांनी स्पष्ट केलं.काही व्यापार्‍यांनी या बंदला कंटाळून आपली दुकानंही उघडली आहेत. येत्या 11 नोव्हेंबरला जकात हटवण्यासंबंधी व्यापार्‍यांची आणि मुख्यमंत्र्यांची एक बैठक होणार आहे. पण, तरीही जकात हटवण्यात आली नाही, तर व्यापारी आपलं बेमुदत उपोषण असंच सुरू ठेवणार आहेत आणि गरज पडल्यास कोर्टात जाण्याची व्यापार्‍यांची तयारी आहे.