#संप

Showing of 326 - 332 from 332 results
'भारत बंद'ला हिंसक वळण

बातम्याFeb 20, 2013

'भारत बंद'ला हिंसक वळण

20 फेब्रुवारीवेगवेगळ्या मागण्यांसाठी कामगारांनी आजपासून दोन दिवसांचा संप पुकारला आहे. पण देशाची राजधानी दिल्लीत संपाला हिंसक वळण मिळाले आहे. आज नॉएडामध्ये काही कारखाने सुरु होते. हे कारखाने बंद करावेत या मागणीसाठी काही कामगार संघटांनानी आंदोलन केलं. यावेळी संतप्त कामगारांनी कारखान्याच्या परिसरात जाळपोळ केली. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून गाड्या पेटवून दिल्या. तर मुंबईत या संपाचा कोणताही परिणाम जाणवलेला नाही. या संपात 34 कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. पण शिवसेनेची कामगार संघटना वगळता या संपात कोणतीही संघटना सहभागी न झाल्यानं मुंबईचं जनजीवन सुरळीत आहे. बेस्ट, रिक्षा, टॅक्सी आणि लोकलसेवा सुरळीत आहे. पण बँक कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्यानं सर्व सरकारी बँका बंद आहेत. पण सहकारी बँकांचं कामकाज सुरळीत सुरू आहे. या बंदला डाव्या संघटनांबरोबरच शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. पण कामगार संघटनेचे नेते शरद राव यांनी संपातून माघार घेतल्यामुळे संपाची धार बोथड झाली आहे.माथाडी, गोदी कामगार आणि वाहतूकदारांचा मोठा प्रतिसादविविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला मुंबईतील माथाडी कामगार, गोदी कामगार आणि वाहतूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला. या संपात कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाल्यानं क्रॉफर्ड मार्केटमधील दाणा मार्केट, लोखंड बाजार आणि इतर ठिकाणी संपाचा चांगलाच परिणाम जाणवत होता. तर गोदीमधील कामगारांनी संप पुकारल्यानं गोदी ठप्प होती.नाशिकमध्ये कामगारांचा मोर्चानाशिकमध्ये 10 हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. यामध्ये सरकारी कर्मचार्‍यांसोबतच बँक, विमा आणि उद्योग क्षेत्रातले कामगारही रस्त्यावर उतरले होते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा शिवाजी स्टेडियमवर विसर्जित करण्यात आला. यामध्ये सीटू, आयटक, भारतीय कामगार सेना आणि मनसे कामगार सेना यांच्यासह अनेक क्षेत्रातले कामगार आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

Live TV

News18 Lokmat
close