#संपत्ती

Showing of 521 - 534 from 541 results
श्रीमंत भारतीयांची संख्या वाढली

बातम्याMar 11, 2010

श्रीमंत भारतीयांची संख्या वाढली

11 फेब्रुवारीफोर्ब्सच्या नव्या यादीनुसार सर्वाधिक श्रीमंत भारतीय व्यक्तींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ झाली आहे. यंदाची सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची संख्या 49 आहे. तर गेल्या वर्षी हीच संख्या 24 होती. सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती आहे, 29अब्ज डॉलर्स.त्यानंतर श्रीमंत भारतीयांमध्ये क्रमांक लागतो, तो लक्ष्मी मित्तल यांचा. फोर्ब्सने यांची ओळख करून दिली आहे, ती लंडनचा श्रीमंत नागरिक म्हणून. त्यांची संपत्ती आहे, 28 अब्ज डॉलर्स. विप्रोचे अझीझ प्रेमजी हे जगातील 28 वे श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांची संपत्ती आहे, 19 अब्ज डॉलर्स.