संजय दत्त

Showing of 209 - 222 from 274 results
संजय दत्तची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी

बातम्याMay 16, 2013

संजय दत्तची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी

मुंबई 16 मे : 1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्त आज दुपारी टाडा कोर्टात शरण आला. त्याची रवानगी आता आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. आजची रात्र संजय दत्तला ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येईल आणि उद्या त्याला कोणत्या कारागृहात ठेवायचं याचा निर्णय तुरूंग निरीक्षक घेतली. संजय दत्त अखेर आज दुपारी पावणे तीनच्या सुमाराला टाडा कोर्टात शरण गेला.यावेळी त्याच्यासोबत 15 गाड्यांचा ताफा होता. पत्नी मान्यता, बहीण प्रिया दत्त आणि निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट, संजयचे मित्र यावेळी त्याच्यासोबत होते. कोर्टाच्या बाहेर मीडियाचा प्रचंड गराडा होता. या प्रचंड गर्दीत संजय दत्त आपल्या कारमधून बाहेर उतरला. आणि कोर्टात शरण गेला. याठिकाणची कायदेशीर प्रक्रिया रात्री नऊ वाजेपर्यंत चालली. त्यानंतर संजय दत्तला आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात आलं. आज त्याचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्येच असेल. इथून त्याला दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. दरम्यान, टाडा कोर्टाबाहेर आपल्याला धक्काबुक्की झाली आणि त्यामुळे या धक्काबुक्कीमुळे छातीत दुखायला लागल्याची तक्रार संजय दत्तनं कोर्टात केली. आपल्याला घरचं जेवण आणि औषध देण्यात यावं, अशी विनंती संजय दत्तनं केली होती. ही विनंती कोर्टाने एक महिन्यासाठी मान्य केली. त्यानंतर त्याला तुरुंगातलं जेवण जेवावं लागणार आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक सिगारेट सोबत ठेवण्याची संजय दत्तची विनंती टाडा कोर्टाने अमान्य केली.