#श्रद्धांजली

Showing of 79 - 92 from 479 results
VIDEO: पर्रिकरांचं जाणं म्हणजे राफेलचा पहिला बळी, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

बातम्याMar 18, 2019

VIDEO: पर्रिकरांचं जाणं म्हणजे राफेलचा पहिला बळी, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

मुंबई, 18 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक गंभीर आरोप केला आहे. मनोहर पर्रिकर यांचा मृत्यू हा राफेलचा पहिला बळी असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 'मनोहर पर्रीकर यांचं जाणं म्हणजे माझ्या अंदाजाने राफेलचा पहिला बळी आहे. मनोहर पर्रिकर हे अत्यंत अभ्यासू, मनमोकळे, साधी राहणी आणि चांगल्या विचारांचे होते. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. राफेलच्या करारासंदर्भात पर्रिकर हे अस्वस्थ होते. यातूनच दिल्लीचं राजकारण आपल्याला जमणार नाही हे ओळखून त्यांनी गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला' असा दावा आव्हाड यांनी केला आहे.