#श्रद्धांजली

Showing of 469 - 475 from 475 results
दहशतवादाला बळी पडलेल्यांना मराठी कलावंतांची श्रद्धांजली

बातम्याDec 2, 2008

दहशतवादाला बळी पडलेल्यांना मराठी कलावंतांची श्रद्धांजली

2 डिसेंबर, मुंबईमराठी कलावंतांनीही मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याची प्रखर शब्दात टीका केलीये. मुंबईतल्या रवीन्द्र नाट्य मंदिरात आयोजित शोकसभेत या मंडळींनी या हल्ल्याचा निषेध केला याबरोबरच या दहशतवादी हल्ल्यात नाहक बळी गेलेल्यांना श्रद्धांजलीही यावेळी या कलाकारांनी दिली. आपल्या शुटिंगच्या बिझी शेड्युलमधून हे कलाकार या कारणासाठी एकत्र आले होते. दहशतवादाला आळा घालणं ही पोलिसांप्रमाणंच सामान्य नागरिकांचीही जबाबदारी असल्याचं मत या कलाकारांनी व्यक्त केलं. " हे लोक असे का वागतात हेच कळत नाही. दहशतवादी हल्ले करून दहशतवाद्यांनी काय साध्य केलंयं, याचाच उलगडा मला नीट होत नाहीये. या दहशतवादाशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही अशा कित्येक निरपराध्यांचे जीव गेले आहेत. त्यामुळे आता सामान्य लोकांनी दक्ष असणं गरजेचं आहे," अशी प्रतिक्रिया मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी व्यक्त केली आहे. " मागचं जुनं उगाळत बसण्यापेक्षा या चालू परिस्थितीवर सगळ्यांनी उपाय शोधला पाहिजे, असं मत विनोदी अभिनेत्री निर्मिती सामंत यांनी व्यक्त केलं आहे. " जे काही झालंय, ज्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत त्यावरून आपल्या सुरक्षेसाठी कोणी येईल याची वाट लोकांनी बघण्यापेक्षा आपणचं आपले रक्षक बना, " असं अभिनेता किरण करमरकर म्हणाला.