#शोध घेणार

असं असेल भारताचं चांद्रयान 2 मिशन, हा VIDEO पाहाच!

व्हिडिओJul 13, 2019

असं असेल भारताचं चांद्रयान 2 मिशन, हा VIDEO पाहाच!

मुंबई, 13 जुलै : लवकरच भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. कारण इस्त्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन चांद्रयान 2 येत्या सोमवारी चंद्रावर पाठवणार आहे. विशेष म्हणजे हे चांद्रयान मानवरहीत असेल तसंच यात वापरलं जाणारं तंत्रज्ञान ही भारतीय आहे. सोमवारी पृथ्वीवरुन चांद्रयान दोननं अवकाशात झेप झेतल्यावर ते 22 ते 23 दिवसांनी म्हणजेच 6 ते 7 सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. या मोहीमेचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल जिथं आजवर कुणी गेलेलं नाही. जवळपास 960 कोटींचं हे चांद्रयान चंद्रावरची खनिजं, पाणी यांचा शोध घेणार आहे.. तसंच चंद्राच्या भुगोलाचं परिक्षण करणार आहे. तिथून हे चांद्रयान इस्रोला माहिती पाठवेल.

Live TV

News18 Lokmat
close