#शॉक

Showing of 40 - 40 from 40 results
सँडल 'प्रसादा'सोबत शॉक पण लागणार !

बातम्याJan 5, 2013

सँडल 'प्रसादा'सोबत शॉक पण लागणार !

05 जानेवारीमहिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा मुकाबला करण्यासाठी ठाण्यातल्या ए.के. जोशी शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवलीय. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी महिलांसाठी खास सँडल बनवलीय. या सँडलमध्ये हाय व्होल्टेज इलेक्ट्रीक शॉक देण्याची व्यवस्था आहे. तसंच धोक्याची सूचना देण्यासाठी सायरन बसवलंय. गुंडांची शेरबाजी पुरावा म्हणून रेकॉर्ड करण्यासाठी रेकॉर्डरही यात आहे. आगामी काळात या सँडलमध्ये जीपीआरएसचाही समावेश करण्यात येणार आहे. ज्यामुळे अपहरण रोखता येऊ शकेल. या हायटेक सँडलची किंमत फक्त 2000 रुपये असणार आहे. सिध्दार्थ वाणी, शांभवी जोशी, चिन्मय मराठे, आणि चिन्मय जाधव यांनी ही खास सँडल तयार केलीय.

Live TV

News18 Lokmat
close