#शुद्ध

Showing of 1 - 14 from 58 results
VIDEO : दुषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते चढले पाण्याचा टाकीवर

व्हिडिओNov 19, 2018

VIDEO : दुषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते चढले पाण्याचा टाकीवर

नागपूर, 18 नोव्हेंबर : महापालिकेकडून होणाऱ्या दुषीत पाणी पुरवठयाकडं लक्ष वेधण्यासाठी आज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले'स्टाईल आंदोलन केलं. नागपूरच्या बुट्टीबोरी भागत गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळं नागरीक त्रस्त आहेत. दुषित पाण्यामुळं याविषयी महापालिकेला वारंवार निवेदन देऊनही उपयोग होत नसल्यामुळं प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. नागपूरमधील बुटिबोरी भगत गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने भागात आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. या भागातील जलशुद्धिकरण प्रकल्प कुचकामी ठरत असून अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा प्रशासन याची दखल घेत नाहीय. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रहार जनशक्ति पक्षाचे तुषार डेरकर व त्यांचे कार्यकर्ते विरुगिरी आंदोलन केलं.

Live TV

News18 Lokmat
close