#शिवाजी पार्क

Showing of 157 - 170 from 190 results
बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त

बातम्याSep 28, 2012

बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त

28 सप्टेंबरउद्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिला जाणार आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहे. मुंबईत गणेश विर्सजनासाठी शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.बंदोबस्त 22 हजार पोलीस 1500 पोलीस अधिकारी रॅपिड ऍक्शन फोर्सच्या दोन कंपन्याबॉर्डर सिक्युरिटी फोर्सची एक कंपनी एसआरपीएफच्या 4 कंपन्या एसआरपीएफच्या शहरातील 27 प्लाटून विसर्जनासाठी प्रमुख ठिकाणंगिरगाव चौपाटी शिवाजी पार्क वांद्रे जुहू मार्वे या चौपाटीच्या दिशेने जाणारे सर्व महत्त्वाचे रस्ते त्या दिवशी गाड्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबईतले 37 रस्ते बंद करण्यात आले आहे. 51 रस्ते एक दिशा मार्ग करण्यात आलेत. तर यातील 60 रस्त्यांवर गाड्या पार्किंगसाठी बंदी करण्यात आली आहे. 12 रस्त्यांवर जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. यावेळी बंदोबस्तासाठी घातपात विरोधी पथक , बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांचाही वापर केला जात आहे. यावेळी गुप्तचर विभागाने कोणताही धोक्याचा इशारा दिला नसला तरी नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचा वापर करावा, पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.