शिवसेना

Showing of 8425 - 8438 from 8668 results
विदर्भाच्या मुद्यावरून युतीत मतभेद

बातम्याDec 10, 2009

विदर्भाच्या मुद्यावरून युतीत मतभेद

10 डिसेंबर विदर्भ स्वतंत्र राज्य व्हावं यासाठी भाजपची तयारी आहे. असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. तर त्याउलट शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी विदर्भ महाराष्ट्रातच राहावा अशी भूमिका घेतली आहे. यावर भाजप आणि शिवसेना यांच्यात विदर्भाच्या मुद्यावरुन वाद झाल्याचं स्पष्ट होतय. एनडीएच्या कार्यकाळात भारतात तीन नव्या राज्यांची निर्मिती झाली. त्यामुळे देशात नवी राज्य व्हावे हा भाजप पक्षाचा राष्ट्रीय धोरण आहे, असंही खडसे म्हणाले. पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी 105 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे विदर्भ महाराष्ट्रातच राहावं आणि त्याच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्यात यावं अशी मागणी सुभाष देसाई यांनी केली आहे. तर काँग्रेसचे खासदार दत्ता मेघे आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनीही दिल्लीत वेगळ्या विदर्भाची मागणी केली. तर माजी मंत्री अनिस अहमद यांनीही वेगळ्या विदर्भाची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या