News18 Lokmat

#शिवसेना

Showing of 5383 - 5396 from 6334 results
रेल्वे बजेटवर शरद पवारांचे पंतप्रधानांना नाराजीपत्र

बातम्याFeb 27, 2013

रेल्वे बजेटवर शरद पवारांचे पंतप्रधानांना नाराजीपत्र

27 फेब्रुवारी मंगळवारी सादर झालेल्या रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहे. त्यावर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी यूपीएच्या बैठकीत थेट नाराजी व्यक्त केलीय. याबाबत पवारांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक पत्रही लिहिलंय. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राचे सर्व खासदार पवारांच्या नेतृत्त्वाखाली पंतप्रधानांना भेटणार आहेत. त्यासाठी पवारांनी पंतप्रधानांकडे वेळ मागितली आहे. मंगळवारी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी 2013-14 चे रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये महाराष्ट्राला ठेंगा दाखवण्यात आलाय. पंढरपूर-विजापूर व्हाया मंगळवेढा, वाशिम-अदिलाबाद आणि परभणी- मनमाड या नवीन गाड्या मिळाल्या आहेत. तर देशाची उपराजधानी नागपूरमध्ये मिनरल वॉटर बॉटलिंग प्लांट आणि विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या रेल्वे बजेटवर महाराष्ट्रातले खासदार चांगलेच संतापले आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे रेल्वे बजेट नसून रायबरेली बजेट आहे. या बजेटमध्ये फक्त रायबरेलीकडे लक्ष देण्यात आलं आहे. त्यामुळे हे रायबरेली बजेट आहे का असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे हे बजेट अन्याय करणारे बजेट आहे अशी टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली.