#शिवसेना

Showing of 27 - 40 from 4272 results
VIDEO : शिवसेना-भाजप युतीवर एकनाथ खडसे म्हणतात...

व्हिडिओFeb 19, 2019

VIDEO : शिवसेना-भाजप युतीवर एकनाथ खडसे म्हणतात...

19 फेब्रुवारी : युतीची घोषणा झाली आहे. त्या निर्णयाचं मी स्वागत करतोय. मागच्या विधान सभेच्या वेळेस युती होऊ शकली नव्हती कारण भाजप पक्षाला अनुकूल वातावरण होतं, त्यामुळे युती न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. पक्षाचा नेता म्हणून ती घोषणा करण्याची जबाबदारी पक्षानं माझ्यावर दिली होती, तो निर्णय माझा एकट्याचा नव्हे तर सर्वांचा होता. आज युती असायला हवी असा विचार प्रवाह असल्या ने मुख्यमंत्र्यांनी आज युतीची घोषणा केली आहे. त्यांचं मी स्वागत करतोय अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. मागच्या कालखंडात युती नसताना भाजपच्या 122 जागा आल्या होत्या. आमच्या वाटेच्या 117 जागा होत्या. जर युती तोडली नसती तर भाजपचं सरकार आणि आमचा मुख्यमंत्री होऊ शकला नसता. आज युती झाल्याने मुख्यमंत्री हा युतीचा असेल, असंही खडसे म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close