शिवसंग्राम Videos in Marathi

VIDEO: 'भाजपसोबत राहायचं असेल तर...' बीडच्या सभेत मुख्यमंत्री आक्रमक

महाराष्ट्रApr 13, 2019

VIDEO: 'भाजपसोबत राहायचं असेल तर...' बीडच्या सभेत मुख्यमंत्री आक्रमक

बीड, 13 एप्रिल : ''गोपीनाथ मुंडेंशिवाय भाजप अपूर्ण आहे. त्यामुळे जो गोपीनाथ मुंडेंसोबत नाही, तो भाजपमध्ये राहू शकत नाही आणि जो भाजपसोबत आहे त्याला गोपीनाथ मुंडेंसोबत रहावंच लागेल. जे आले त्यांना घेवून आणि जे आले नाहीत त्यांच्या शिवाय आम्ही विजयाकडे वाटचाल करणार'', असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या प्रचार सभेत नाव न घेता विनायक मेटेंना इशारा दिला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. वास्तविक शिवसंग्राम हा पक्ष महायुतीचा घटकपक्ष आहे. असं असताना बीडमध्ये मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.