#शिर्डी

Showing of 482 - 495 from 519 results
शिर्डी बंद

बातम्याAug 25, 2010

शिर्डी बंद

25 ऑगस्टलंडनवारीला साईबाबांचं पादुका घेऊन जाण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या विरोधामुळे रद्द करावा लागला. मात्र शिर्डीच्या ग्रमास्थांचा विरोध अजुनही संपलेला नाही. साईबाबांच्या दानपेटीत आलेले 100 कोटी रुपये होऊ घातलेल्या विमानतळाला देऊ नये अशी भूमिका गावकर्‍यांनी घेतली आहे. बुधवारी दिवसभर शिर्डी बंदची हाक गावकर्‍यांनी दिली असून आमरण उपोषणाला गावकरी बसणार आहेत. साई मंदीरासह भक्त निवास , प्रसादालय या गोष्टी चालू राहतील . मात्र गावातील सर्व हॉटेल्स , प्रसाद आणि फुलांची दुकाने बंद राहणार असल्यामुळे साई भक्तांना बाबांच्या दर्शनाला मोकळ्या हाताने जावं लागणार आहे. बंदचा परिणाम साई भक्तांवर फारसा होण्याची शक्यता आहे.तर विधी न्यायमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे-पाटील यांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे.