शाहरूख खान

Showing of 183 - 187 from 187 results
'लक बाय चान्स' विषयी उत्सुकता

बातम्याJan 28, 2009

'लक बाय चान्स' विषयी उत्सुकता

28 जानेवारी, मुंबईमिहीर त्रिवेदीझोया अख्तरचं पहिलंच दिग्दर्शन असलेला 'लक बाय चान्स' या आठवड्यात रिलीज होतोय. सध्या अख्तर भावंडं म्हणजे झोया आणि फरहान सिनेमाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड बिझी आहेत. या सिनेमात गेस्ट ऍपिरिअन्समध्ये ह्रतिक रोशन आहे हे तर सगळयांनाच माहितीये, पण या सिनेमात आणखी बरीच सरप्राईझेस आहेत.रॉक ऑनमधून फरहान अक्तरनं ऍक्टिंगला सुरुवात केली, तर आता त्याची बहीण झोया अख्तर लक बाय चान्समधून दिग्दर्शनाला सुरुवात करतेय. फरहान अभिनय तर करतोच आहे. पण फरहानला सगळ्यात टेन्शन होतं ते यातल्या डान्सचं! "यात एक लव साँग आह ज्यात मी एका डोंगरावरून दुसर्‍या डोंगरावर जातो आणि दोन्ही हात पसरून नाचतो. हा परफार्मन्स माझ्यासाठी खूपच अवघड होता." असं फरहाननं सांगितलं.या सिनेमात प्रेक्षकांसाठी भरपूर बोनस आहे. ह्रतिक रोशन तर आहेच. पण झोयानं एकाच सिनेमात पहिल्यांदा शाहरूख खान आणि आमीर खानला घेतलंय. पण ते दोघं एकाच दृश्यात आहेत का? "दोघंही गेस्ट ऍपियरन्समध्ये आहेत.एक फरहानबरोबर तर दुसरा कोंकणाबरोबर आहे." असं झोया अख्तर म्हणाली.अख्तर भावंडांनी बॉक्स ऑफिसचा पुरेपुर विचार केलेला दिसतोय. मग सिनेमा हिट झाला तर तो नक्कीच लक बाय चान्समुळे नसेल.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading